ऐन निवडणुकीत साखर घोटाळ्याची चौकशी; मायावतींच्या अडचणीत वाढ
27 April 11:55

ऐन निवडणुकीत साखर घोटाळ्याची चौकशी; मायावतींच्या अडचणीत वाढ


ऐन निवडणुकीत साखर घोटाळ्याची चौकशी; मायावतींच्या अडचणीत वाढ

कृषिकिंग, लखनऊ: केन्द्रीय अन्वेषण विभागानं (सीबीआय) उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या कार्यकाळात साखर कारखान्यांत झालेल्या अनियमिततेची चौकशी सुरू केलीये. त्यामुळे उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या अडचणीत वाढ झालीये.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०११-१२ मध्ये मायावती यांच्या कार्यकाळात साखर कारखान्यांच्या विक्रीत बाजारदरापेक्षा कमी किंमतीत विकल्यानं सरकारी तिजोरीला कथित स्वरुपात जवळपास ११७९ करोड रुपयांचं नुकसान सहन करावं लागलंय. ऐन लोकसभा निवडणूक २०१९ च्या रणधुमाळीत हा घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आलाय, त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे.

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारनं गेल्या वर्षी १२ एप्रिल रोजी या प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. तब्बल वर्षभरानंतर सीबीआयला या चौकशीसाठी सवड मिळालीय. दरम्यान, या साखर घोटाळ्याच्या चौकशीत अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याला अथवा मंत्र्याला आरोपी बनवण्यात आलं नसल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलंय. परंतु, उत्तर प्रदेश राज्य साखर महामंडळ लिमिटेडचे कारखाने खरेदी करण्यासाठी खोटी कागदपत्रं जमा करणाऱ्या सात जणांविरुद्ध ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.



टॅग्स

संबंधित बातम्या