'नवरंग' पक्षाचं कोकणात आगमन; लवकरच मॉन्सून दाखल होण्याचे संकेत
27 April 08:30

'नवरंग' पक्षाचं कोकणात आगमन; लवकरच मॉन्सून दाखल होण्याचे संकेत


'नवरंग' पक्षाचं कोकणात आगमन; लवकरच मॉन्सून दाखल होण्याचे संकेत

कृषिकिंग, रत्नागिरी: मॉन्सूनच्या पावसात गेल्या काही दिवसांपासून अनियमितता पाहायला मिळतिये. त्यामुळे हवामान विभागाचे अंदाजही अनेकदा चुकीचे ठरताहेत. अशा परिस्थितीत मॉन्सूनच्या आगमची चाहूल देणाऱ्या नवरंग (इंडियन पिट्टा) पक्षाचं कोकणात आगमन झालंय. त्यामुळे यावर्षी लवकरच मॉन्सूनचं आगमन होणार असल्याच्या हवामान विभागाच्या अंदाजाला दुजोरा मिळालाय.

श्रीलंका ते हिमालयाचा पायथा असे स्थलांतर करणारा नवरंग पक्षी मॉन्सूनचा अंदाज येताच भारतामध्ये विशेषतः कोकणामध्ये दाखल होतो. भडक रंगाचा, भुंड्या शेपटीचा मैनेसारखा असणारा हा पक्षी हिरव्या पंखांचा असतो. निळा, तांबूस, काळा आणि पांढरा असा वरच्या अंगाचा रंग असून, शेपटीच्या खालच्या बाजूचा रंग किरमिजी रंगाचा असतो. तर पुढच्या बाजूला पिवळसर रंगाचा असतो.

नवरंग हा पक्षी भारतात साधारणतः एप्रिल महिन्यात स्थलांतर करतो. त्याचे आगमन झाल्यानंतर बरोबर एक महिन्याने मॉन्सूनचे भारतात आगमन होते. सध्या नवरंग हा पक्षी भारतात दाखल झाला असून, त्याच्या आगमनाने लवकरच मॉन्सूनही भारतात दाखल होण्याचे संकेत मिळत आहे.टॅग्स

संबंधित बातम्या