मोदी सरकार जाईपर्यंत कपडे न घालण्याचा शेतकऱ्याचा निर्धार; शरद पवारांना दिलं निवेदन
24 April 17:11

मोदी सरकार जाईपर्यंत कपडे न घालण्याचा शेतकऱ्याचा निर्धार; शरद पवारांना दिलं निवेदन


मोदी सरकार जाईपर्यंत कपडे न घालण्याचा शेतकऱ्याचा निर्धार; शरद पवारांना दिलं निवेदन

कृषिकिंग, नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (बुधवार) नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे सभा घेतली. या सभेत अचानक एका शेतकऱ्याने व्यासपीठावर प्रवेश करून शरद पवारांना निवेदन दिलं. सरकारच्या शेतीविषयक धोरणांना विरोध करत या शेतकऱ्याने अर्धनग्न आंदोलन सुरू आहे. याशिवाय हे सरकार बदलणार नाही, तोपर्यंत शर्ट घालणार नाही, अशी भूमिकाही या शेतकऱ्याने घेतली आहे.

कृष्णा डोंगरे असं या शेतकऱ्याचं नाव असून, कृष्णा मोदी सरकारचा निषेध म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून अर्धनग्न अवस्थेत फिरत आहे. आज शरद पवारांच्या सभेवेळी या शेतकऱ्याने त्यांना याबाबत निवेदन दिले आहे. यावर पवारांनीही त्याचं हे निवेदन स्वीकारत त्याला 'काळजी करू नको,' असं म्हटलं आहे.

याच शेतकऱ्याने जमिनीच्या प्रश्नावरून काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. मात्र, त्याच्या आंदोलनावर सरकारने दडपशाही केल्याचा आरोप त्याने केला आहे. त्यानंतर मार्च महिन्यात आपले कपडे आणि चप्पल या शेतकऱ्याने पंतप्रधान कार्यालयाला स्पीड पोस्टने पाठवले आहेत.

"भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी काहीतरी करील, या आशेनं २०१४ मध्ये मोदींना मतदान केलं. मात्र, मोदी सरकारच्या काळात शेतकयांच्या परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. त्यामुळे केंद्रातून आणि राज्यातून मोदी भाजपचं सरकार हटवलं पाहिजे. विधानसभेच्या मतदानावेळी मी कपडे घालेन." असे कृष्णाने सांगितले आहे.संबंधित बातम्या