मॉन्सूनचा पाऊस कसा असेल? राम जाणे! मात्र, शेतकरी खरिपासाठी सज्ज
24 April 10:58

मॉन्सूनचा पाऊस कसा असेल? राम जाणे! मात्र, शेतकरी खरिपासाठी सज्ज


मॉन्सूनचा पाऊस कसा असेल? राम जाणे! मात्र, शेतकरी खरिपासाठी सज्ज

कृषिकिंग, पुणे: यावर्षी मॉन्सूनचा पाऊस कसा असेल, राम जाणे! मात्र, सध्या शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असून खरीप हंगामासाठी शेती सज्ज करीत आहेत. ही सर्व कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जात असून, बैलांचा वापर मागे पडल्याचे पाहायला मिळत आहे. मागील वर्षीच्या दुष्काळाने बळीराजापुढे आर्थिक संकट उभे असले तरी शेतीची मशागत पुन्हा त्याच जोशाने सुरु आहे.

चारा पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांकडे बैलजोडी नाही. त्यामुळे ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेताची नागरणी ट्रॅक्टरद्वारे केली जात आहे. यंत्रामुळे रोटावेटर, कल्टीवेटर आदी कामे करून तापत्या उन्हामुळे जमिनीची पोत कायम राहत असल्याचा समज आहे. शेतातील तण वेचणीची कामे सकाळच्या प्रहारात उरकविण्याचा सपाटा सुरू आहे. मृग नक्षत्राला अजून दोन महिन्यांचा कालावधी असल्याने कामे उरकवून लग्नकार्यात सहभागी होण्यासाठी उसंतही मिळत आहे.

आगामी खरीप हंगामाला सामोरे जात असताना पारंपरिक पिकांनी सतत तीन वर्षांपासून पाठ फिरविल्याने व योग्य भाव मिळत नसल्याने कोणते पीक घ्यावे, या विवंचनेत सध्या शेतकरी आहे.टॅग्स

संबंधित बातम्या