'साखरेचं अधिक उत्पादन कराल तर खड्ड्यात जाल'- गडकरी
23 April 12:53

'साखरेचं अधिक उत्पादन कराल तर खड्ड्यात जाल'- गडकरी


'साखरेचं अधिक उत्पादन कराल तर खड्ड्यात जाल'- गडकरी

कृषिकिंग, सांगली: "साखरेऐवजी इथेनॉलचे उत्पादन घेतले पाहिजे. तरच पश्‍चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने टिकतील. भविष्यात साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाल्यास कारखानदार आणि शेतकऱ्यांना कोणीही वाचवू शकणार नाही," असा इशारा केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी दिला आहे. सांगली दौऱ्यावर असताना ते बोलत होते. साखरेचे अधिक उत्पादन कराल तर खड्ड्यात जाल. असेही ते यावेळी म्हणाले आहे.

याशिवाय ”टेंभू योजनेचे पाणी आले आहे. याचा सर्वांनाच आनंद वाटला. या पाण्यामुळे पिकांना जास्ती जास्त पाणी उपलब्ध होणार आहे. पण पाणी आले म्हणून नुसता ऊस लावून साखरेचे उत्पादन घेऊ नका. नाहीतर साखर कारखानदारी अडचणीत येतील पण शेतकरीही अडचणीत येणार आहेत. असा धोक्याचा इशाराही गडकरी यांनी यावेळी दिला आहे.”टॅग्स

संबंधित बातम्या