यावर्षीच्या गाळप हंगामात सोलापूर जिल्हाने पटकावला पहिला क्रमांक; पाहा तुमच्या जिल्ह्याचा कितवा क्रमांक?
22 April 18:02

कृषिकिंग, पुणे: यावर्षीचा गाळप हंगाम संपत आला असून, १९५ पैकी १९० कारखान्यांची धुराडी बंद झालीये. यावर्षीच्या गाळप हंगामात सोलापूर जिल्हा गाळपात प्रथम क्रमांकावर तर १ कोटी ३६ लाख १० हजार ९२३ मेट्रिक टन गाळप करून अहमदनगर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावर्षी अहमदनगर जिल्ह्याने कोल्हापूरला मागे टाकून ही कामगिरी केली आहे.

जिल्हानिहाय गाळपाचे आकडेवारी:
- सोलापूर जिल्ह्याचे एकूण गाळप: १ कोटी ६० लाख ३७ हजार ९० मेट्रिक टन
- अहमदनगर जिल्ह्याचे एकूण गाळप: १ कोटी ३६ लाख १० हजार ९२३ मेट्रिक टन
- कोल्हापूर जिल्ह्याचे एकूण गाळप: १ कोटी ३३ लाख ३७ हजार ६६२ मेट्रिक टन
- पुणे जिल्ह्याचे एकूण गाळप: १ कोटी १९ लाख ७३ हजार ६४६ मेट्रिक टन

दरम्यान, राज्याचे आतापर्यंत ९५१.६४ मे.टन ऊस गाळप झाले असून, त्याद्वारे १०७०.७४ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. तर राज्यात ऊस गाळपात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय असणाऱ्या सोलापूर, अहमदनगर व कोल्हापूर जिल्ह्याचे संपूर्ण कारखाने सध्या बंद झाले आहेत.

(स्रोत: साखर आयुक्त कार्यालय)टॅग्स

संबंधित बातम्या