साखर कारखान्यावर छापा; बेकायदा दारू उत्पादन होते सुरू
22 April 12:27

साखर कारखान्यावर छापा; बेकायदा दारू उत्पादन होते सुरू


साखर कारखान्यावर छापा; बेकायदा दारू उत्पादन होते सुरू

कृषिकिंग, तेलंगणा: बेकायदेशीररित्या दारू उत्पादन करणाऱ्या साखर कारखान्यावर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर दारूचा आणि कच्च्या मालाचा साठा जप्त करण्यात आला आहे. तेलंगणाच्या वानापर्थी जिल्ह्यातील कोट्टाकोटा तालुक्यात असलेल्या एनएसएल कृष्णावेनी साखर कारखाना आणि पेब्बारी तालुक्यातील श्रीरंगपूरमधील एबीडी दारूच्या कारखान्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. दक्षता पथक आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ही कारवाई केली आहे.

या कारवाईमध्ये १४२ क्विंटल सार्वजनिक वितरणातील तांदूळ, युरिया खताची ८० पोती आणि काही रिकामी पोती जप्त करण्यात आली आहेत. एनएसएल कृष्णावेनी साखर कारखान्याकडे दारू उत्पादनाचा परवाना नाही. मात्र, तेथे मळीपासून मोठ्या प्रमाणावर दारू तयार करण्यात येत होती. छापा टाकल्यानंतर तेथून युरियाचा मोठा साठा जप्त करण्यात आला. युरियाचा इतक्या मोठ्या प्रमाणावर साठा असल्याचा धक्का बसल्याचे अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी (ईडी) राजेंद्र यांनी सांगितले आहे.

जप्त करण्यात आलेला सर्व साठा जिल्ह्याच्या कृषी विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. सार्वजनिक वितरणासाठीचा तांदूळ, खते इतक्या मोठ्याप्रमाणावर कशी बाहेर पडली, याची कसून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.टॅग्स

संबंधित बातम्या