'सिंघम' चित्रपटातील जयकांत शिक्रे राजू शेट्टींच्या प्रचारार्थ आज कोल्हापुरात
19 April 18:08

'सिंघम' चित्रपटातील जयकांत शिक्रे राजू शेट्टींच्या प्रचारार्थ आज कोल्हापुरात


'सिंघम' चित्रपटातील जयकांत शिक्रे राजू शेट्टींच्या प्रचारार्थ आज कोल्हापुरात

कृषिकिंग, कोल्हापूर: सिंघम चित्रपटात जयकांत शिक्रे या खलनायकाची भूमिका साकारणारे दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश यांनी आज (शुक्रवार) राजू शेट्टींच्या प्रचारसभेला हजेरी लावली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रकाश राज यांनी राजू शेट्टींसाठी प्रचार केला. प्रकाश राज हेही या लोकसभा निवडणुकीत मध्य बंगळुरू मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

राजू शेट्टींच्या किसान संघर्ष यात्रा तसेच शेट्टी यांच्या वाटचालीमुळे मी अत्यंत प्रभावित झालो आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ हातगणंगलेत आलो आहे. असे प्रकाश राज यांनी यावेळी बोलतांना सांगितले आहे. राजू शेट्टींच्या शेतकरी संघटनेच्या कामाबद्दल प्रकाश राज यांनी कौतुक केलं आहे. यावेळी, त्यांनी जाहीर सभेला संबोधितही केले.

२०१४ मध्ये भाजपसोबत असलेले राजू शेट्टी एनडीए सरकारमधून बाहेर पडले. राज्यातही त्यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राजू शेट्टी यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर खासदार राजू शेट्टी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.संबंधित बातम्या