कारखान्याला ऊस घेऊन जाताना शेतकऱ्याला महिलांच्या टोळीनं लुटलं; पाहा कुठं घडली घटना?
19 April 16:26

कारखान्याला ऊस घेऊन जाताना शेतकऱ्याला महिलांच्या टोळीनं लुटलं; पाहा कुठं घडली घटना?


कारखान्याला ऊस घेऊन जाताना शेतकऱ्याला महिलांच्या टोळीनं लुटलं; पाहा कुठं घडली घटना?

कृषिकिंग, लखनऊ: साखर कारखान्याला देण्यासाठी ऊस घेऊन चाललेल्या शेतकऱ्याला मारहाण करून त्याचा ७० क्विंटल ऊस लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तरप्रदेशातील बीसलपूर-पीलीभीत मार्गावर पतरासा कुंवरपूर गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या संदर्भात अमृताखास गावातील शेतकरी प्रेमपाल यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, "बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास ट्रॉलीमध्ये ऊस चढवून ते ट्रॅक्टरने साखर कारखान्याकडे निघाले होते. रात्री साडे नऊच्या सुमारास कुंवरपूर गावाजवळ काही जणांनी मला अडवले. त्यांच्या टोळीत चार महिला आणि चार पुरुष होते. त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवलं आणि एकजण ट्रॅक्टर घेऊन गेला. याशिवाय मला मारहाण करून बरगदा गावात बागेत चार तास बांधून ठेवले. रात्री दोनच्या सुमारास मोबाईल काढून घेऊन मला सोडून देण्यात आले."

पोलिसांना बजाज नोबेल साखर कारखान्याबाहेर प्रेमपाल यांचा ट्रॅक्टर सापडला. पण, त्यातील ७० क्विंटल ऊस गायब होता. ट्रॉलीतून ऊस बजाज कारखान्यात देण्यात आला की नाही, याविषयी स्पष्ट माहिती मिळालेली नाही. त्या पार्श्वभूमीवरही चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.टॅग्स

संबंधित बातम्या