विदर्भ-मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी करताहेत राजू शेट्टींचा प्रचार
19 April 10:32

विदर्भ-मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी करताहेत राजू शेट्टींचा प्रचार


विदर्भ-मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी करताहेत राजू शेट्टींचा प्रचार

कृषिकिंग, कोल्हापूर: विदर्भ व मराठवाड्यातील जवळपास १०० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी राजू शेट्टींचा प्रचार करणार आहे. काल (शुक्रवारी) या सर्व महिला कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे प्रचाराची सांगता होईपर्यँत गावोगावी जाऊन शेट्टींना निवडून देण्याचे आवाहन करणार आहेत.

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भ व मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांना आजपर्यंत आत्महत्या केल्या. या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना खासदार राजू शेट्टी यांनी संसदेत व प्रसंगी रस्त्यावर उतरून ३४०० कोटींची मदत मिळवून दिली. त्यांच्या याच उपकाराची परतफेड म्हणून या महिलांना शेट्टी यांच्या प्रचारार्थ मैदानात उतणार आहे.

दुष्काळाने नापिकीचा सामना करणाऱ्या विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर कपाशीवर पडलेल्या बोंड अळीने मोठा घाला घातला. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या या शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. कुटुंब उघड्यावर पडल्याची दाहकता सहन न झाल्याने त्या भागाशी काहीही संबंध नसतानाही संवेदनशील शेतकरी या नात्याने खासदार शेट्टी यांनी धाव घेतली.

नुकसानग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून विदर्भ, मराठवाड्यात रस्त्यावर उतरून लढाई सुरू केली. आंदोलने करतानाच संसदेतही आवाज उठवला. दबावगट तयार होऊन सरकारला ३४०० कोटींची नुकसानभरपाई जाहीर करणे भाग पडले. ज्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळाला. त्यांच्या याच उपकाराची जाणीव ठेऊन विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी शेट्टींचा प्रचार करत आहे.संबंधित बातम्या