वादळी पावसामुळे पंजाबमधील ३.५ लाख हेक्टरवरील गहू पीक जमीनदोस्त
18 April 15:05

वादळी पावसामुळे पंजाबमधील ३.५ लाख हेक्टरवरील गहू पीक जमीनदोस्त


वादळी पावसामुळे पंजाबमधील ३.५ लाख हेक्टरवरील गहू पीक जमीनदोस्त

कृषिकिंग, जालंधर: देशभरात गेल्या ४ ते ५ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता या वादळी पावसामुळे पंजाबमधील ३.५ लाख हेक्टरवरील गहू पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले असल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी अधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, पाकिस्तानकडून येत राजस्थानजवळ निर्माण झालेल्या चक्रीय वात स्थितीमुळे उत्तर भारतीय राज्यांसह, मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे २१ एप्रिलपर्यंत उत्तर भारतीय राज्यांसह मध्य भारतातील वातावरण हे असेच राहण्याची शक्यता आहे. याकाळात गारपिटीसह जोरदार पाऊस होऊ शकतो. असे हवामान विभागाकडून सांगण्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही आपल्या काढणी केलेल्या धान्याची अन्य कृषी उत्पादनांची काळजी घ्यावी, असे आवाहनही हवामान विभागाकडून यावेळी करण्यात आले आहे.टॅग्स

संबंधित बातम्या