दुर्दैवी घटना: विद्युत तारांच्या स्पर्शाने ७ म्हशींचा मृत्यू; १ जखमी
18 April 12:58

दुर्दैवी घटना: विद्युत तारांच्या स्पर्शाने ७ म्हशींचा मृत्यू; १ जखमी


दुर्दैवी घटना: विद्युत तारांच्या स्पर्शाने ७ म्हशींचा मृत्यू; १ जखमी

कृषिकिंग, बीड: शेतात चरायला गेलेल्या म्हशींना तुटलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्यामुळे ७ म्हशी जागीच ठार झाल्या तर एक गंभीर जखनी आहे. ही घटना बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या वाडी शिवारात घडली आहे. या घटनेत ७ म्हशींचा मृत्यू झाल्याने ३ शेतकऱ्यांचे जवळपास ८ लाखांचे नुकसान झाले आहे.

आष्टी तालुक्यात मंगळवारच्या रात्री वादळी पावसाने चांगलेच थैमान घातले होते. या वादळात विद्युत तारा तुटून जमिनीवर पडल्या व तशाच प्रवाहित राहिल्या. बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास बांबर्डा येथील शेतकरी अंबादास चंदिवाले यांच्या तीन म्हशी, पिराजी चंदिवाले यांच्या दोन, शिवाजी चंदिवाले यांच्या दोन व नामदेव चंदिवाले यांची १ अशा आठ म्हशी वाडी शिवारातील मनाबाई चामलाटे यांच्या शेताजवळील पडिक भागात चरण्यासाठी गेल्या होत्या. चरत असताना वादळामुळे तुटून पडलेल्या जीवंत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने एका पोठोपाठ सात म्हशी ठार झाल्या तर एक म्हैस दुर असल्याने ती विद्यूत स्पर्श होताच फेकल्या गेली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे.

दरम्यान, पोलीस व महावितरणच्या अभियंत्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. यात शेतकऱ्यांचे आठ लाख रुपयाचे नुकसान झाले असून महावितरणने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.संबंधित बातम्या