मोदींच्या सभास्थळी शेती संंबंधित उत्पादने येणार नाही, याची काळजी घ्या; गृहविभागाचं पोलिसांना पत्र
18 April 11:21

मोदींच्या सभास्थळी शेती संंबंधित उत्पादने येणार नाही, याची काळजी घ्या; गृहविभागाचं पोलिसांना पत्र


मोदींच्या सभास्थळी शेती संंबंधित उत्पादने येणार नाही, याची काळजी घ्या; गृहविभागाचं पोलिसांना पत्र

कृषिकिंग, मुंबई/नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदींची नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे २२ एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या वेळी पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेविषयी अधिक चिंतित असलेल्या राज्य सरकारच्या गृहविभागाने पोलीस यंत्रणेला पत्र पाठवलं आहे. या पत्रात पिंपळगाव येथे होत असलेल्या सभेत येणाऱ्या श्रोत्यांकडून शेती संंबंधित उत्पादने अथवा कोणतीही वस्तू सभास्थळी आणली जाणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला देण्यात आले आहेत.

गृहविभागाचे हे पत्र म्हणजे मोदी यांच्या सभेत शेतकरी गोंधळ घालण्याची शक्यता अधोरेखित करीत असून, त्यामुळे प्रशासन व पोलीस यंत्रणा प्रचंड धास्तावली आहे. गुप्तचर यंत्रणा गेल्या पंधरा दिवसांपासून प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे. असे असले तरी, कांदा व द्राक्षाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत येथे होणाऱ्या या सभेत शेतकऱ्यांचा रोष व्यक्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कांदा, द्राक्षासह सर्वच शेतीमालाचे गेल्या पाच वर्षांत कोसळलेले भाव त्यामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी यापूर्वीच वेळोवेळी सरकारच्या धोरणांच्या विरोधात रस्त्यावर उतरला असताना आता तर प्रत्यक्ष देशाचा पंतप्रधानच दारी येत असल्यामुळे त्यांच्या समक्षच आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध असणार आहे. त्यामुळे या सभेत नक्कीच काहीतरी गोंधळ पाहायला मिळू शकतो.संबंधित बातम्या