बीड जिल्ह्यात 'जलयुक्त शिवार'मध्ये ४ कोटींचा भ्रष्टाचार; २४ अधिकाऱ्यांना अटक
17 April 17:55

बीड जिल्ह्यात 'जलयुक्त शिवार'मध्ये ४ कोटींचा भ्रष्टाचार; २४ अधिकाऱ्यांना अटक

बीड जिल्ह्यात 'जलयुक्त शिवार'मध्ये ४ कोटींचा भ्रष्टाचार; २४ अधिकाऱ्यांना अटक

कृषिकिंग, बीड: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार या महत्त्वकांक्षी योजनेचा बीडमध्ये पर्दाफाश झालाय. जलयुक्त शिवार योजनेत सरकारी अधिकारी आणि ठेकेदारांनी संगनमताने तब्बल ४ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचं समोर आलं आहे.

याप्रकरणी बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेने आत्तापर्यंत २४ सरकारी अधिकाऱ्यांना अटक केली असून, १९ अधिकारी फरार आहे. पोलीस त्यांचा शोध घेतायेत. संबंधित अधिकाऱ्यांनी बीडमधील परळी तालुक्यात या योजनेची अंमलबजावणी करताना हा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

गेल्या महिन्यात स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाचा योग्य तपास होत नसल्याचा आक्षेप घेतल्यानंतर हे प्रकरण बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आले होते. त्यानंतर आता पोलिसांनी ही कारवाई केली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या