महाराष्ट्र दुसऱ्या टप्प्यातील मतदान; ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी महागात पडू शकते
18 April 08:30

महाराष्ट्र दुसऱ्या टप्प्यातील मतदान; ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी महागात पडू शकते


महाराष्ट्र दुसऱ्या टप्प्यातील मतदान; ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी महागात पडू शकते

कृषिकिंग, पुणे: आज अर्थात १८ एप्रिल २०१९ रोजी राज्यातील १० ऊस उत्पादक लोकसभा मतदार संघांमध्ये मतदान होत आहे. मात्र, आजही राज्यातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांची एकूण ४ हजार ८३१ कोटींची थकबाकी शिल्लक आहे. त्यामुळे आधीच दुष्काळाच्या झळा, त्यातच उसाचे पैसे भेटत नसल्याने शेतकऱ्यांची सरकारवर प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी सत्ताधारी पक्ष भाजप-सेनेला चांगलीच महागात पडू शकते.

राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या लोकसभा जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. हे सर्व लोकसभा मतदार संघ ऊस पट्ट्यातील आहेत.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या १० जागांपैकी ५ जागा भाजपाला मिळाल्या होत्या. तर शिवसेनेला ३ आणि काँग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी यावेळी कोणाच्या पारड्यात आपली मतं टाकणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, सध्या राज्यातील १८६ कारखान्यांनी आपले गाळप बंद केले असून, केवळ ९ कारखान्यांचे गाळप सुरु आहे.टॅग्स

संबंधित बातम्या