धरणे, तलावांतील पाणी पिण्यासाठीच वापरावे- मुख्य सचिव
17 April 12:25

धरणे, तलावांतील पाणी पिण्यासाठीच वापरावे- मुख्य सचिव


धरणे, तलावांतील पाणी पिण्यासाठीच वापरावे- मुख्य सचिव

कृषिकिंग, मुंबई: राज्यात सध्या ३ हजार ३७९ गावे आणि ७ हजार ८५६ वाड्यांवर ४ हजार ३२९ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध मृत पाणीसाठ्याचे नियोजन करुन त्याचा वापर प्राधान्याने पिण्यासाठी करावा. अशा सक्त सूचना मुख्य सचिव यु.पी.एस.मदान यांनी राज्यातील गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या संदर्भांत आढावा बैठक त्यांनी घेतली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले आहेत.

याशिवाय सध्या टँकर ज्या ठिकाणांवरुन भरले जातात तेथे पिण्याचे पाणी किती कालावधीसाठी उपलब्ध होऊ शकेल, याचा आढावा यंत्रणेने तातडीने घ्यावा. त्याचबरोबर अन्य कुठल्या स्त्रोतावरुन पाणी उपलब्ध होऊ शकेल याबाबतची खातरजमा उपविभागीय अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी करावी. ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर्स मंजूर आहेत तेथे जीपीएसच्या सहाय्याने मंजूर फेऱ्यानुसार पाणीपुरवठा होत आहे की नाही याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी दैनंदिन माहिती घ्यावी आणि आवश्यक त्या प्रमाणात पाणीपुरवठा होईल यासाठी प्रयत्न करावे. अशा सूचनाही मुख्य सचिव यु.पी.एस.मदान यांनी दिल्या आहेत.



संबंधित बातम्या