महिन्याभरात राज्यात १७४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; राजकीय नेते प्रचारात दंग
17 April 11:22

महिन्याभरात राज्यात १७४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; राजकीय नेते प्रचारात दंग


महिन्याभरात राज्यात १७४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; राजकीय नेते प्रचारात दंग

कृषिकिंग, पुणे: मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून आतापर्यंत १७४ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. सर्व राजकीय पक्षांचे पुढारी लोकांकडे मतांचा जोगवा मागत फिरत असताना, नापिकी, शेतमालाला मातीमोल भाव, कर्जबाजारीपणातून होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांचे मात्र कोणालाच देणेघेणे नसल्याची स्थिती राज्यभर पाहायला मिळतिये.

गेल्या महिनाभरात दुष्काळाची सर्वाधिक झळ सोसणाऱ्या मराठवाड्यात ९१ शेतकऱ्यांनी, विदर्भात ४९ शेतकऱ्यांनी, खानदेशात १५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. बागायती पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातही ९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर इतर जिल्ह्यांमध्ये १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये अहमदनगरचाही समावेश आहे.

राज्य सरकारने राज्यभरातील शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली. तर केंद्र सरकारनेही चालू वर्षापासून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले आहे. तरीही शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. यावर्षी दुष्काळामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तर सध्या निवडणुकीच्या प्रचारातील राजकारण्यांची ९८ टक्के भाषणे ही एकमेकांवर आरोप करणारी आहेत. या रणधुमाळीत शेतकऱ्यांचा प्रश्नांचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या, त्यांच्या आर्थिक प्रश्नांना बगल दिली जात आहे.संबंधित बातम्या