मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा; ३५ जणांचा मृत्यू
17 April 10:52

मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा; ३५ जणांचा मृत्यू


मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा; ३५ जणांचा मृत्यू

कृषिकिंग, नवी दिल्ली: गेल्या ४-५ दिवसांपासून देशभरातील हवामानात अचानक मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच काल (मंगळवारी) गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड, हिमाचल, हरियाणा आणि राजधानी दिल्लीमध्ये विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे ३५ जणांचा मृत्यू तर ४० जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात या तीन राज्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. केवळ या तीन राज्यांमध्ये काल ३५ पैकी २८ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने सांगितले आहे की, देशभरातील हवामान पुढील दोन दिवस असेच राहण्याची शक्यता आहे. पाकिस्तानकडून येत राजस्थानजवळ निर्माण झालेल्या चक्रीय वात स्थितीमुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामस्वरूप, उत्तर-पश्चिम भारत, मध्य भारतात महाराष्ट्रापर्यंत अचानक ढगाळ वातावरण, जोरदार अवकाळी पाऊस, गारा पडणे अशा घटना घडत आहेत.

दरम्यान, गुजरातमध्ये या अवकाळी पावसामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्वांच्या कुटुंबियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मदत निधी योजनेतून प्रत्येकी २ लाखांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत तात्काळ घोषित केली आहे.संबंधित बातम्या