शेतकऱ्यांचा मृत्यू निवडणूक प्रचाराचा मुद्दा, मग शहीद जवानांचा का नाही?- नरेंद्र मोदी
16 April 18:02

शेतकऱ्यांचा मृत्यू निवडणूक प्रचाराचा मुद्दा, मग शहीद जवानांचा का नाही?- नरेंद्र मोदी


शेतकऱ्यांचा मृत्यू निवडणूक प्रचाराचा मुद्दा, मग शहीद जवानांचा का नाही?- नरेंद्र मोदी

कृषिकिंग, नवी दिल्ली: जेव्हा शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. तेव्हा तो मुद्दा निवडणूक प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनतो. मग जेव्हा एक जवान देशासाठी शहीद होतो तर तो निवडणुकीचा मुद्दा का असू शकत नाही? असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आरोपावर बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.

मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांना तुमचं पहिलं मत हे देशासाठी शहीद झालेल्या जवानांना समर्पित करा असं आवाहन जाहीर व्यासपीठावरुन केलं होतं. पंतप्रधानांच्या या विधानावर विरोधकांनी आरोप केला होता. या आरोपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देत अशा शब्दांमध्ये विरोधकांना प्रतिप्रश्न केला आहे.

देशात शेतकऱ्यांचा मृत्यू जेवढा महत्त्वाचा मुद्दा आहे. तेवढाच देशभक्ती आणि शहीदांचे बलिदान निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे आहेत. मागील ४० वर्षापासून देश दहशतवादाशी लढतोय. जर देशातील लोकांसमोर जर आम्ही सांगितले नाही देशातील दहशतवादावर आमचे विचार काय आहेत. तर त्याला अर्थ काय राहणार? कोणताही देश देशभक्तीच्या भावनेशिवाय पुढे जाऊ शकतो का? असा प्रश्नही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी विरोधकांना केला आहे.



संबंधित बातम्या