'...तर भावाच्या अस्थी मातोश्रीवर पाठवणार,' ढवळे कुटुंबीयांचा उद्धव ठाकरेंना इशारा
16 April 15:11

'...तर भावाच्या अस्थी मातोश्रीवर पाठवणार,' ढवळे कुटुंबीयांचा उद्धव ठाकरेंना इशारा


'...तर भावाच्या अस्थी मातोश्रीवर पाठवणार,' ढवळे कुटुंबीयांचा उद्धव ठाकरेंना इशारा

कृषिकिंग, उस्मानाबाद: 'उस्मानाबाद जिल्ह्यातील दिलीप ढवळे या शेतकऱ्यानं आर्थिक फसवणूक झाल्यानं आत्महत्या केल्याची घटना तीन-चार दिवसांपूर्वी समोर आली होती. ढवळे यांच्या आत्महत्येला आता चार दिवस उलटूनही अद्याप याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. कारण सर्व नेत्यांना निवडणूक महत्त्वाची वाटते. याप्रकरणी आता पोलिसांनी आणि प्रशासनाने कारवाई केली नाही, तर भावाच्या अस्थी उद्धव ठाकरे यांचं निवास मातोश्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार,' असा इशारा ढवळे कुटुंबीयांनी दिला आहे.

दिलीप ढवळे यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये शिवसेनेचे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांच्या नावाचा उल्लेख केला होता. मात्र, त्यांच्या आत्महत्येला चार दिवस उलटले असले तरीही अद्याप कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे ढवळे कुटुंबीयांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा इशारा दिला आहे.संबंधित बातम्या