मोदींच्या सभेत कांदाफेकीची शक्यता; अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज
16 April 12:10

मोदींच्या सभेत कांदाफेकीची शक्यता; अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज


मोदींच्या सभेत कांदाफेकीची शक्यता; अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज

कृषिकिंग, नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (२२ एप्रिलला) नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत जाहीर सभा होणार आहे. सकाळी ९ वाजता पिंपळगावच्या जोपुळ रस्त्यावरील बाजार समितीच्या प्रागंणात ही सभा होणार आहे. या सभेदरम्यान कांदाफेकीसारखा कोणताही अनुचित प्रकार घडू नये. म्हणून प्रशासन व सुरक्षा विभाग आतापासूनच कामाला लागला आहे.

चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल आहेर, व निफाडचे आमदार अनिल कदम यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र पाठवत सभेला परवानगी मागितली आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांच्या उपस्थितीत सोमवारी प्रशासनाची आढावा बैठक पार पडली. यावेळी पंतप्रधानांच्या जाहीर सभेच्या बंदोबस्ताचे नियोजन आणि तयारीच्या सूचना विविध विभागांना पत्र पाठवून देण्यात आल्या आहे.

राजकीय रणधुमाळीत सभेत कोणताही गोंधळ किंवा कांदा प्रश्नावरून तीव्र भावना व्यक्त होऊ शकतात. यापूर्वीही नाशिक जिल्ह्यात विविध पक्षांच्या राजकीय सभांमध्ये कांदा फेकीपासून, निषेध फलक दाखवत गोंधळ झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सध्यस्थितीत दुष्काळ आणि कांदा दराच्या प्रश्नामुळे अशी परिस्थिती उद्भवू शकते. या शक्यतेवरून प्रशासन बंदोबस्ताच्या दृष्टीने सर्वोतोपरी काळजी घेत आहे.संबंधित बातम्या