तिसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार बॅटींग सुरूच; वीज पडून ३ जणांचा मृत्यू
16 April 10:06

तिसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार बॅटींग सुरूच; वीज पडून ३ जणांचा मृत्यू


तिसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार बॅटींग सुरूच; वीज पडून ३ जणांचा मृत्यू

कृषिकिंग, पुणे: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलीये. आजही (मंगळवार) अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असून, वर्धा जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि जोरदार वादळवाऱ्यासह सकाळपासून पाऊस सुरु आहे. तर राज्यातील अनेक शहरांमध्ये आज आणि उद्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

मनमाड, मालेगाव, येवला, लासलगाव, नांदगांव, सटाणा यांसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाने कालही जोरदार हजेरी लावली. संगमनेरमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. तर पुणे जिल्ह्यातील सासवड, पुरंदर तालुक्यांसह जेजुरी परिसरातही जोरदार पाऊस झाला आहे.

दरम्यान, नाशिकच्या मालेगाव वादळी वाऱ्यामुळे झाड अंगावर कोसळल्यानं मोटारसायकलवर जाणाऱ्या व्यापाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर परभणी जिल्ह्यात वीज कोसळल्यामुळे २ मेंढपाळांचा मृत्यू झाला असून, १५ ते २० शेळ्या आणि मेंढ्याही दगावल्या आहे.टॅग्स

संबंधित बातम्या