राजू शेट्टींच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची कोल्हापुरात उद्या 'मन'से सभा
15 April 17:09

राजू शेट्टींच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची कोल्हापुरात उद्या 'मन'से सभा


राजू शेट्टींच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची कोल्हापुरात उद्या 'मन'से सभा

कृषिकिंग, पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या (मंगळ्वार) कोल्हापुरातील इचलकरंजी शहरात सभा घेणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ राज यांच्याकडून ही सभा घेतली जाणार आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता ही सभा होणार आहे.

राजू शेट्टी हे कोल्हापूरच्या हातकणंगले लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. त्यांचे निवडणूक चिन्ह बॅट आहे. त्यांच्या प्रचारार्थ राज यांच्याकडून ही सभा घेतली जाणार आहे. या सभेच्या निमित्ताने राज ठाकरे आणि राजू शेट्टी पहिल्यांदाच जाहीर व्यासपीठावर एकत्र दिसणार का?. की राज ठाकरे अप्रत्यक्षरीत्या शेट्टींना 'मन'से पाठिंबा देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

खरंतर, हातकणंगले हा राजू शेट्टी यांचा बालेकिल्ला आहे. तेथून शेट्टी विजयी होतील, असा अनेक सर्वेक्षणांनीही अंदाज वर्तवला आहे. मात्र, राज ठाकरेंच्या सभेने राजू शेट्टींचा विजय आणखी मोठा होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.संबंधित बातम्या