यावर्षी देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार- आयएमडी
15 April 16:12

यावर्षी देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार- आयएमडी


यावर्षी देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार- आयएमडी

कृषिकिंग, नवी दिल्ल्ली: यावर्षी देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचा (आयएमडी) यावर्षीच्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यां (मॉन्सून) च्या हंगामातील (जून ते सप्टेंबर) पावसाचा पहिला दीर्घकालीन अंदाज आज दुपारी ३ वाजता जाहीर करण्यात आला. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन नायर यांनी नवी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे.

हवामान खात्याच्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हवामान खात्याकडून मान्सूनविषयीचा दुसरा अंदाज व्यक्त करण्यात येईल. त्यावेळी देशात किती पाऊस पडेल, याचा आणखी नेमका अंदाज येईल.

काही दिवसांपूर्वी स्कायमेटच्या अंदाजानुसार देशात मान्सून सरासरीच्या ९३ टक्के पडणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. भारतातील मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव असेल असाही अंदाज स्कायमेटनं वर्तवला होता. मात्र, आता हवामान विभागाकडून देशात यावर्षी चांगला मान्सून होणार असल्याचा अंदाज व्यक्त वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात (महाराष्ट्रात) पावसाळ्यानंतर विधासभा निवडणूक होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या वर्षात मॉन्सूनचा रंग कसा असणार? याची उत्सुकता आता शेतकऱ्यांसोबतच राजकारणी, सत्ताधारी आणि सरकारही लागून राहिली आहे.संबंधित बातम्या