राज्यातील कारखान्यांकडून आतापर्यंत १३ कोटी ३६ लाख ८४ हजार लिटर इथेनॉलचा पुरवठा
15 April 15:49

राज्यातील कारखान्यांकडून आतापर्यंत १३ कोटी ३६ लाख ८४ हजार लिटर इथेनॉलचा पुरवठा


राज्यातील कारखान्यांकडून आतापर्यंत १३ कोटी ३६ लाख ८४ हजार लिटर इथेनॉलचा पुरवठा

कृषिकिंग, पुणे: देशातील ऑईल कंपन्यांनी साखर कारखाने आणि इथेनॉल निर्मिती करणाऱ्या युनिटशी २३७ कोटी लिटर इथेनॉल पुरविण्याचा करार केला आहे. ऑईल कंपन्यांनी राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांना ४७ कोटी ६४ लाख ९ हजार लिटर इथेनॉल निर्मितीचा कोटा दिला आहे. त्यापैकी राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी मार्च अखेरपर्यंत एकत्रितपणे १३ कोटी ३६ लाख ८४ हजार लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे.

सन २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. उसापासून तयार होणाऱ्या मोलॅसिसपासूनच नव्हे तर, उसाचा रस, खराब धान्य, सडलेले बटाटे, मका आणि अधिक उत्पादन झालेले धान्य या पासूनही इथेनॉल निर्मिती करण्यात येणार आहे.

राज्यातील ७२ कारखान्यांची इथेनॉल निर्मितीची क्षमता ५७ कोटी १८ लाख लिटर आहे. यामध्ये सहकारी कारखान्यांची ४० कोटी २७ लाख ५० हजार लिटर इथेनॉल निर्मिती क्षमता आहे. मात्र, सहकारी कारखान्यांना २० कोटी ३३ लाख ७७ हजार लिटर इथेनॉलचा पुरविण्याचा कोटा मिळाला आहे. त्यात ७ कोटी ६६ लाख ६६ हजार लिटर इथेनॉल सहकारी कारखान्यांनी पुरविले आहे. अजून राज्यातून २२ कोटी ४४ लाख ९४ हजार लिटर इथेनॉल पुरविणे अपेक्षित आहे.टॅग्स

संबंधित बातम्या