उत्तरप्रदेश सरकारने गहू खरेदीचे लक्ष्य ५ लाख टनांनी वाढवले
15 April 12:50

उत्तरप्रदेश सरकारने गहू खरेदीचे लक्ष्य ५ लाख टनांनी वाढवले


उत्तरप्रदेश सरकारने गहू खरेदीचे लक्ष्य ५ लाख टनांनी वाढवले

कृषिकिंग, लखनऊ: उत्तरप्रदेश सरकारने गहू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. युपी सरकारने गहू खरेदीचे लक्ष्य ५० लाख टनांवरून ५५ लाख टनांपर्यंत वाढवले आहे. युपी सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे की, सरकारने गहू खरेदीत आचारसंहितेचा मुद्दा बाधा ठरणार नाही, यासाठी काळजी घेतली आहे. याशिवाय सर्व जिल्हाधिकाऱ्यांना खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निर्देश देण्यात आले आहे.

केंद्र अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य खाद्य सचिवांच्या बैठकीत उत्तरप्रदेशातून ५० लाख टन गहू खरेदीस मंजुरी देण्यात आली होती. मात्र, यूपी सरकारने त्यात वाढ करून, ५५ लाख टन गहू खरेदीचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, चालू वर्षीच्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारने गव्हासाठी १८४० रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत किंमत निर्धारित केली आहे. जी मागील वर्षीच्या हंगामासाठी १७३५ रुपये प्रति क्विंटल निर्धारित करण्यात आली होती.

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, यावर्षी उत्तरप्रदेशात ३५० लाख टन गहू उत्पादन होण्याची शक्यता आहे. भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या आकडेवारीनुसार, मागील वर्षीच्या हंगामात युपीमधून ५२.९४ लाख टन गहू खरेदी करण्यात आली होती. दरम्यान, यावर्षीच्या हंगामात १ एप्रिल ते १५ जून २०१९ या कालावधीत राज्यात गहू खरेदी सुरु असणार आहे. १२ एप्रिलपर्यंत उत्तरप्रदेशात १४ हजार टन गहू खरेदी करण्यात आली आहे.संबंधित बातम्या