अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात ३ जणांचा मृत्यू; गहू, आंबा, द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान
15 April 12:01

अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात ३ जणांचा मृत्यू; गहू, आंबा, द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान


अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात ३ जणांचा मृत्यू; गहू, आंबा, द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान

कृषिकिंग, नाशिक: विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने काल (रविवारी) नाशिक जिल्ह्यात दाणादाण उडविली. दिंडोरी तालुक्यात वीज अंगावर पडून एकाच कुटुंबातील दोघांसह तिघांचा मृत्यू झाला. तर नाशिकसह दिंडोरी आणि येवल्यात वीज अंगावर पडून चार जनावरे दगावली. या बेमोसमी पावसाने कांदा आणि गहू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, आंबा आणि द्राक्षबागांनाही या पावसाचा फटका बसला आहे.

आज (सोमवारी) देखील वातावरण असेच राहील असा इशारा हवामान विभागाने दिला असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असून चांदवड, येवल्यासह काही भागात दोन दिवसांपुर्वी बेमोसमी पावसाने हजेरी लावली होती.

तर काल (रविवारी) दुपारी टळटळीत उन्हाचा सामना करणाऱ्या नाशिककरांना चारनंतर मात्र ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवू लागला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अधिकच अंधारून आले. त्यानंतर काही वेळातच विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह शहरासह जिल्ह्यातही पावसाच्या जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली.संबंधित बातम्या