मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले; ५ जण ताब्यात
15 April 10:57

मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले; ५ जण ताब्यात


मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले; ५ जण ताब्यात

कृषिकिंग, अमरावती: अमरावती जिल्ह्यातील परतवाडा इथे मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. काळे झेंडे दाखवणाऱ्या पाच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अमरावतीत महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारसभेदरम्यान प्रकार घडला आहे.

मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहताच २० ते २५ जणांनी निषेध असो अशा घोषणा देत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. योग्य मोबदला आणि पुनर्वसन न झाल्याने प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांसमोर गोंधळ घातला. घोषणाबाजी करणाऱ्या लोकांची जमीन धरणात गेली असून, या लोकांना आपल्या जमिनी द्याव्यात अशी त्यांची मागणी आहे.

दरम्यान, गोंधळ घालणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा सुरळीत पार पडली. एकीकडे काही लोकांकडून निषेध-निषेध नारे दिले जात होते, तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते मोदी-मोदीची घोषणाबाजी करत होते. मात्र, या सर्व प्रकारामुळे सभेच्या ठिकाणी काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.संबंधित बातम्या