ताजी बातमी: साताऱ्यात जोरदार पाऊस; कालपासून राज्यातील अनेक भागात पावसाची हजेरी
13 April 17:38

ताजी बातमी: साताऱ्यात जोरदार पाऊस; कालपासून राज्यातील अनेक भागात पावसाची हजेरी


ताजी बातमी: साताऱ्यात जोरदार पाऊस; कालपासून राज्यातील अनेक भागात पावसाची हजेरी

कृषिकिंग, सातारा: सातारा जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावलीये. आज (शनिवारी) दुपारी ३ वाजताच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले. आणि अचानक साताऱ्यासह आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस सुरु झाला. दरम्यान, अचानक आलेल्या या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पुण्यातही आज ढगाळ हवामान असून, काही ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली आहे.

याशिवाय राज्याच्या अनेक भागांमध्ये कालपासून (शुक्रवारी) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरणामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घट झालीये. काल (शुक्रवारी) रात्री ८ वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह नागपूरच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. २४ तासात नागपुरात ४.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातही काल दुपारी ४ वाजताच्या सुमारास काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, पुण्यासह राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) दोनच दिवसांपूर्वी (गुरुवारी) व्यक्त करण्यात आला होता. तो अगदी तंतोतंत खरा ठरला आहे. यासंबंधीचे वृत्त कृषिकिंगने प्रसिद्ध केले होते. बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. http://bit.ly/2KrK2iOटॅग्स

संबंधित बातम्या