दुष्काळग्रस्तांसाठीचा उर्वरीत निधी तात्काळ देण्यात यावा; मदत व पुनर्वसन विभागाचं केंद्राला पत्र
13 April 16:49

दुष्काळग्रस्तांसाठीचा उर्वरीत निधी तात्काळ देण्यात यावा; मदत व पुनर्वसन विभागाचं केंद्राला पत्र

दुष्काळग्रस्तांसाठीचा उर्वरीत निधी तात्काळ देण्यात यावा; मदत व पुनर्वसन विभागाचं केंद्राला पत्र

कृषिकिंग, मुंबई: 'केंद्र सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी ४ हजार ५६० कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली होती. त्यापैकी २००० हजार कोटींचा निधी महाराष्ट्र सरकारला यापूर्वीच प्राप्त झाला आहे. मात्र, राज्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारला पत्र पाठवून उर्वरीत अडीच हजार कोटींचा निधी तात्काळ देण्यात यावा.' अशी मागणी राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाने केंद्र सरकारकडे केली आहे.

केंद्र सरकारने राज्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ४ हजार ५६० कोटींचा मदत निधी दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर केला. त्यातील २ हजार कोटींचा मदत निधी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला सुपूर्द करण्यात आला. मात्र, तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला गेला तरी उर्वरित अडीच हजार कोटींचा निधी राज्य सरकारला मिळालेला नाही. त्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून हे पत्र पाठवण्यात आले आहे.टॅग्स

संबंधित बातम्या