लासलगाव येथून १ मेट्रिक टन आंबा अमेरिकेला रवाना
13 April 12:05

लासलगाव येथून १ मेट्रिक टन आंबा अमेरिकेला रवाना


लासलगाव येथून १ मेट्रिक टन आंबा अमेरिकेला रवाना

कृषिकिंग, लासलगाव: आपल्या चवीमुळे जगभरातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आंब्याची अमेरिका वारी लासलगाव मार्गे सुरु झाली आहे. पहिल्या आंब्यांची कंसायमेन्ट ११ एप्रिल रोजी लालसगाव येथून प्रक्रिया होऊन यु.एस ला पाठवण्यात आली आहे. या कंसायमेन्टच्या माध्यमातून १ मेट्रिक टन (३३० बॉक्स) आंबे हे अर्गो सर्च इरिडेशन प्रायव्हेट लिमिटेच्या माध्यमातून पाठवण्यात आले आहे.

विकिरण प्रक्रियेमध्ये उष्णतेचा वापर न करता पदार्थ टिकवले जात असल्याने त्यांचा स्वाद आणि ताजेपणा अधिक कळू टिकून राहतो. याशिवाय भारतीय आंबे चविष्ट असल्याने विदेशातुन त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.टॅग्स

संबंधित बातम्या