नागपुरातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
13 April 10:59

नागपुरातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस


नागपुरातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

कृषिकिंग, नागपूर: नागपुरातील अनेक भागात काल (शुक्रवारी) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे नागपूरचे तापमान गेल्या २४ तासात १.७ डिग्री सेल्सियसपर्यंत खाली आले होते. त्यातच रात्री ८ वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासात नागपुरात ४.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आठवडाभर नागपूर आणि आसपासच्या प्रदेशात अशाच प्रकारचे वातावरण असणार आहे. आकाशात ढगाळ वातावरण असले तरी तापमान ४० डिग्रीवर राहील. दुपारी उकाडाही जाणवेल. पाऊसही येऊ शकतो.संबंधित बातम्या