शिवसेना उमेदवाराचं चिठ्ठीत नाव लिहून शेतकऱ्याची आत्महत्या
13 April 10:14

शिवसेना उमेदवाराचं चिठ्ठीत नाव लिहून शेतकऱ्याची आत्महत्या


शिवसेना उमेदवाराचं चिठ्ठीत नाव लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

कृषिकिंग, उस्मानाबाद: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच उस्मानाबादमध्ये एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप करत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

ओमराजे निंबाळकर आणि विजय दंडनाईक यांनी केलेल्या आर्थिक फसवणुकीला कंटाळून कसबे तडवळे गावातील ५९ वर्षीय शेतकरी दिलीप ढवळे यांनी आपलं जीवन संपवलं आहे. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. शेतातील झाडाला गळफास लावून दिलीप ढवळे यांनी आत्महत्या केली आहे.

ढवळे यांनी आपल्या चिठ्ठीत लिहिले आहे की, 'ओमराजे निंबाळकर आणि वसंतदादा बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक यांच्यामुळे मला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. या दोघांनीही माझी आर्थिक फसवणूक केली आहे. माझ्या चार एकर जमिनीवर कर्ज घेऊन सर्व रक्कम तेरणा कारखान्यासाठी वापरण्यात आली. हमी देऊनही परतफेड न केल्यामुळे जमिनीचा तीनदा लिलावदेखील करण्यात आला. त्यातून गावामध्ये माझी बदनामी झाली. सततचा दुष्काळ आणि आर्थिक परिस्थितीमुळे मी आत्महत्या करत आहे.'

दरम्यान, पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असल्याचं ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. जी. वेव्हळ यांनी सांगितले आहे.



टॅग्स

संबंधित बातम्या