पाकिस्तानात १८० रुपये प्रति लिटर मिळतंय दूध; पाहा काय आहे संपूर्ण बातमी?
12 April 18:19

पाकिस्तानात १८० रुपये प्रति लिटर मिळतंय दूध; पाहा काय आहे संपूर्ण बातमी?

पाकिस्तानात १८० रुपये प्रति लिटर मिळतंय दूध; पाहा काय आहे संपूर्ण बातमी?

कृषिकिंग, नवी दिल्ली: भारताशी वैर घेणं पाकिस्तानला चांगलंच महागात पडतंय. कारण सतत धडा शिकवण्याची भाषा करणाऱ्या आणि काश्मीरमध्ये कायम कुरघोड्या करणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अधिकाधिक बिकट होत असल्याचे समोर आले आहे. भाजीपाला आणि अन्य दैनंदिन वस्तूंच्या दरांमध्ये मोठी वाढ होण्यासह आता दुधाच्या दराचा भडका पाकिस्तानात पाहायला मिळतोय.

याशिवाय पाकिस्तानमध्ये पेट्रोल, डिझेलचे दरही गगनाला भिडले आहेत. यात आता दुधाची भर पडली आहे. कराची डेयरी फार्मर्स असोसिएशननं दुधाच्या दरात अचानक प्रति लीटर २३ रुपयांनी वाढ केली. त्यामुळे पाकिस्तानमध्ये दुधाचा दर १८० रुपयांवर पोहोचला आहे. दुधाच्या दरात मोठी वाढ झाल्यानं पाकिस्तानी जनता मेटाकुटीला आली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या