पंतप्रधान मोदींना रशियाचा ‘सेंट एंड्रयू अवॉर्ड’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर
12 April 16:37

पंतप्रधान मोदींना रशियाचा ‘सेंट एंड्रयू अवॉर्ड’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर


पंतप्रधान मोदींना रशियाचा ‘सेंट एंड्रयू अवॉर्ड’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर

कृषिकिंग, नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा ‘सेंट एंड्रयू अवॉर्ड’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी याबाबतच्या या प्रस्तावावर सही केली आहे. रशियन दुतावासाने याबाबतची अधिकृत माहिती जारी केली आहे.

रशिया आणि भारत यांच्यातील संबंध एका नव्या उंचीवर नेल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आलाय. हा पुरस्कार मिळवणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान असतील. यापूर्वी हा पुरस्कार चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना देण्यात आला होता.

नुकतीच संयुक्त अरब अमिरातीनेही (यूएई) मोदींना आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्कार (जायद) देण्याची घोषणा केली होती. याशिवाय यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दक्षिण कोरियाने सियोल शांती पुरस्काराने सन्मानित केलं होतं. याशिवाय मोदींना संयुक्त राष्ट्राकडूनही चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार देण्यात आला होता.

२०१४ पासून सत्तेत आल्यांनतर सतत विदेश करण्याच्या विरोधकांच्या टीकेला मोदींना सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांचे हल्ले सहन करत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही नक्कीच चांगली बातमी असणार आहे.संबंधित बातम्या