गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीत १६.५५ टक्क्यांनी घट; बासमती तांदळाची निर्यात वाढली
13 April 08:30

गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीत १६.५५ टक्क्यांनी घट; बासमती तांदळाची निर्यात वाढली


गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीत १६.५५ टक्क्यांनी घट; बासमती तांदळाची निर्यात वाढली

कृषिकिंग, नवी दिल्ली: बांग्लादेशसह आफ्रिकी देशांमधून आयात मागणी कमी झाल्याने गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीत घट झाली आहे. तर इराक, इराण, अमेरिका या देशांमधून मागणी वाढल्याने बासमती तांदळाच्या निर्यातीत वाढ झाली आहे.

२०१८-१९ या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यांमध्ये (एप्रिल ते फेब्रुवारी) या कालावधीत गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीत १६.५५ टक्क्यांनी घट झाली असून, ती यावर्षी ६७.११ लाख टन इतकी नोंदवली गेली आहे. दरम्यान, याच कालावधीत बासमती तांदळाच्या निर्यातीत ६.२५ टक्क्यांनी वाढ होऊन, ती ३८.५५ लाख टन इतकी नोंदवली गेली आहे.

एपीडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २०१७-१८ च्या पहिल्या ११ महिन्यांमध्ये गैर-बासमती तांदळाची निर्यात ८०.४२ लाख टन इतकी झाली आहे. जी यावर्षी (२०१८-१९ कमी होऊन, ६७.११ लाख टन इतकी नोंदवली गेली आहे. तर २०१८-१९ च्या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या ११ महिन्यांमध्ये ३८.५५ लाख टन बासमती तांदळाची निर्यात झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत ३६.२८ लाख टन इतकी नोंदवली गेली होती.टॅग्स

संबंधित बातम्या