यावर्षीच्या गाळप हंगामात केवळ १७.४४ लाख टन साखर निर्यात
14 April 14:50

यावर्षीच्या गाळप हंगामात केवळ १७.४४ लाख टन साखर निर्यात


यावर्षीच्या गाळप हंगामात केवळ १७.४४ लाख टन साखर निर्यात

कृषिकिंग, नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात कोसळलेल्या साखरेच्या दरांमुळे देशातील साखर निर्यात ही मर्यादित स्वरूपात होत आहे. १ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या चालू वर्षीच्या (२०१८-१९) गाळप हंगामात आतापर्यंत (६ एप्रिलपर्यंत) देशातून केवळ १७.४४ लाख टन साखरेची निर्यात झाली आहे. याउलट केंद्र सरकारकडून यावर्षीच्या गाळप हंगामात ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.

ऑल इंडिया शुगर ट्रेड एसोसिएशनच्या आकडेवारीनुसार, चालू वर्षीच्या गाळप हंगामात आतापर्यंत (१ ऑक्टोबर २०१८ ते ६ एप्रिलपर्यंत २०१९) देशातील कारखान्यांनी आतापर्यंत २१.७४ लाख टन साखर निर्यातीचे व्यापार सौदे केले आहेत. ज्यामध्ये केवळ १७.४४ लाख टन साखरेची शिपमेंट झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून कारखान्यांना निर्यातीसाठी वाहतूक अनुदानही दिले जात आहे.

ऑल इंडिया शुगर ट्रेड एसोसिएशनच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशातून झालेल्या एकूण निर्यातीपैकी सर्वाधिक निर्यात ही बांग्लादेशमध्ये करण्यात आली आहे. चालू गाळप हंगामात बांग्लादेशला ३ लाख ५६ हजार ७२८ टन साखर निर्यात करण्यात आली आहे. याशिवाय श्रीलंकेला २ लाख ८७ हजार ४९८ टन, सोमालियाला २ लाख १२ हजार ७६० टन, इराणला १ लाख १२ हजार ५०० टन तर सुदानला १ लाख १९ हजार ४०१ टन साखर निर्यात करण्यात आली आहे. याशिवाय अन्य देशांना उर्वरित ६ लाख ३२ हजार १३८ टन साखर निर्यात करण्यात आली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या