'शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार? मोदींच्या सभेत महिला-शेतकऱ्याने झळकावलं पोस्टर
12 April 14:11

'शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार? मोदींच्या सभेत महिला-शेतकऱ्याने झळकावलं पोस्टर

'शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार? मोदींच्या सभेत महिला-शेतकऱ्याने झळकावलं पोस्टर

कृषिकिंग, अहमदनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारार्थ प्रचारसभा घेतली. या सभेत एका महिलेने झळकावलेल्या पोस्टर्सची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

'शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार? शेतमालाला हमीभाव कधी मिळणार?' असे प्रश्न विचारणारे पोस्टर्स या महिलेने झळकावले आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींची नगरमधील सभा चांगलीच चर्चेत आली आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'अच्छे दिन येणार' असल्याचे दिले होते. त्याचा आश्वासनाचा संदर्भ घेऊन या महिलेने शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार? हमीभाव कधी मिळणार? असे प्रश्न विचारले आहे.संबंधित बातम्या