यावर्षी देशात ३२१ लाख गाठी कापूस उत्पादन होण्याची शक्यता- सीएआय
14 April 13:00

यावर्षी देशात ३२१ लाख गाठी कापूस उत्पादन होण्याची शक्यता- सीएआय


यावर्षी देशात ३२१ लाख गाठी कापूस उत्पादन होण्याची शक्यता- सीएआय

कृषिकिंग, नवी दिल्ली: कापूस उद्योगाकडून आतापर्यंत ४ वेळा यावर्षीच्या उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुधारित अंदाजानुसार, २०१८-१९ या चालू पीक वर्षात कापसाच्या उत्पादनात यापूर्वीच्या अंदाजापेक्षा ७ लाख (१ गाठ= १७० किलो) गाठींनी घट होण्याची शक्यता आहे. यावर्षी देशात ३२१ लाख गाठी इतके कापूस उत्पादन होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी देशात ३६५ लाख गाठी इतके कापसाचे उत्पादन झाले होते.

भारतीय कापूस महामंडळाचे (सीएआय) अध्यक्ष अतुल एस.गणात्रा यांनी सांगितले आहे की, "तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या प्रमुख उत्पादक राज्यांसह तामिळनाडू, ओडिसा मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. याशिवाय अन्य राज्यांमध्ये मॉन्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने प्रति हेक्टरी उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटली आहे.

दरम्यान, भारतीय कापूस महामंडळाने ऑक्टोबर २०१८ मध्ये यावर्षी ३४८ लाख गाठी कापूस उत्पादन होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यात आता चौथ्या सुधारित अंदाजानुसार २७ लाख गांठींपर्यंत कपात करण्यात आली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या