नतद्रष्ट शेतकरी नेत्याला या निवडणुकीत घरी बसवा; उद्धव ठाकरेंचा राजू शेट्टींवर घणाघात
12 April 10:46

नतद्रष्ट शेतकरी नेत्याला या निवडणुकीत घरी बसवा; उद्धव ठाकरेंचा राजू शेट्टींवर घणाघात

नतद्रष्ट शेतकरी नेत्याला या निवडणुकीत घरी बसवा; उद्धव ठाकरेंचा राजू शेट्टींवर घणाघात

कृषिकिंग, कोल्हापूर: 'शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या नतद्रष्ट शेतकरी नेत्याला या निवडणुकीत घरी बसवा,' असा घणाघात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांच्यावर केलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील इस्मापूर येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी झालेल्या ‘विजय संकल्प सभेत’ ठाकरे बोलत होते.

शिवसेना जे करते ते रोखठोक करते. गेल्या ४ ते ५ वर्षांत आमचे संबंध गोड, मधूर, कडू असले तरी, चांगल्या कामात कधी पाय आडवा घातला नाही. शेतकरी आणि जनतेसाठी शिवसेना-भाजपची युती ताकद पणाला लावणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. ठाकरे यांच्यासोबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांसह अनेक नेते या सभेला उपस्थित होते.टॅग्स

संबंधित बातम्या