तुमच्या खात्यात २ हजार रुपये आले ना?; शेतकऱ्यांना प्रश्न विचारणाऱ्या राजनाथ सिंह यांची कोंडी
11 April 17:35

तुमच्या खात्यात २ हजार रुपये आले ना?; शेतकऱ्यांना प्रश्न विचारणाऱ्या राजनाथ सिंह यांची कोंडी


तुमच्या खात्यात २ हजार रुपये आले ना?; शेतकऱ्यांना प्रश्न विचारणाऱ्या राजनाथ सिंह यांची कोंडी

कृषिकिंग, पटना: प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत तुमच्या खात्यात २ हजार रुपये आले ना? असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकऱ्यांना विचारला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी एका सूरात 'नाही....' असं उत्तर दिलं. त्यामुळे राजनाथ सिंह यांची चांगलीच नाचक्की झाली.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बिहारच्या दौऱ्यावर होते. यावेळी पूर्णिया जिल्ह्याच्या एनडीए उमेदवाराच्या प्रचारासाठी राजनाथ सिंह शेतकऱ्यांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या आयुष्यमान भारत, कृषी सन्मान या योजनांबद्दल ते बोलत होते. यावेळी शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळणाऱ्या ६ हजारांच्या मदतीबद्दल भरभरून बोलताना, "तुम्हाला खात्यात २ हजार रुपयांचा पहिला हप्ता आला का? असा प्रश्न सिंह यांनी विचारला. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी एका सूरात 'नाही.....' असं उत्तर दिल्यामुळे राजनाथ सिंह चांगलीच कोंडी झाली.

यानंतर त्यांनी आपली बाजू सावरत कोणाच्या तरी खात्यात २ हजाराची रक्कम जमा झाली असेल ना?, असा प्रश्न केला. त्यांच्या या प्रश्नाला शेतकऱ्यांकडून प्रतिसादच आला नाही. त्यावर त्यांनी असं कसं होऊ शकतं? कोणाला तरी लाभ मिळाला असेल? ज्यांना मिळाला, त्यांना आपले हात वर करा. ज्यांना लाभ मिळाला, त्यांनीच आपले हात वर करावेत, असं राजनाथ सिंह म्हणाले. मात्र, एकाही शेतकऱ्यानं हात वर केला नाही. त्यानंतर राजनाथ यांनी मंचावर बसलेल्या नेत्यांना योजनेचा लाभ का मिळाला नाही? असा प्रश्न विचारला. या संपूर्ण प्रकारामुळे राजनाथ सिंह यांची चांगलीच कोंडी झाली.संबंधित बातम्या