मराठवाड्यातील २४ तालुक्यांमध्ये दुष्काळाचे गंभीर संकट; २ ते ४ मीटरने पाणीपातळी खालावली
11 April 14:55

मराठवाड्यातील २४ तालुक्यांमध्ये दुष्काळाचे गंभीर संकट; २ ते ४ मीटरने पाणीपातळी खालावली

मराठवाड्यातील २४ तालुक्यांमध्ये दुष्काळाचे गंभीर संकट; २ ते ४ मीटरने पाणीपातळी खालावली

कृषिकिंग, औरंगाबाद: मराठवाड्यात दुष्काळ दिवसेंदिवस रौद्ररूप धारण करत आहे. भूजल सर्वेक्षणाच्या अहवालात ४३ तालुक्यांतील पाणीपातळी २ ते ४ मीटरपर्यंत घटल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे २०१२ च्या तुलनेत ही घट दुपटीपेक्षा अधिक आहे. तर उर्वरित ६९ तालुक्यांतही परिस्थिती कठीण आहे.

मराठवाड्याच्या फुलंब्री, पैठण, सिल्लोड, कन्नड, वैजापूर, उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा, वाशी, कळंब, भूम, परंडा, भोकरदन, परतूर, सेलू, वसमत, औंढा, जळकोट, गेवराई, शिरूर कासार, धारुर, माजलगाव, लातूर या २४ तालुक्यांमध्ये दुष्काळाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. तर ४३ तालुक्यांतील पाणीपातळी २ ते ४ मीटरपर्यंत घटल्याचे समोर आले आहे.

मराठवाड्यातील ८७२ प्रकल्पांमध्ये केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक आहे. भूजल सर्वेक्षण गेल्या पाच वर्षांपासूनची सरासरी ग्राह्य धरून घट मोजते.टॅग्स

संबंधित बातम्या