कामचं नसल्याने शेतमजुरांवर शहरात कचरा जमा करण्याची वेळ
11 April 14:24

कामचं नसल्याने शेतमजुरांवर शहरात कचरा जमा करण्याची वेळ


कामचं नसल्याने शेतमजुरांवर शहरात कचरा जमा करण्याची वेळ

कृषिकिंग, औरंगाबाद: मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असल्यामुळे शेतात काम नाही. अनेक ठिकाणी पिकं सुकून गेल्याने शेतकऱ्यांनीच ती उद्ध्वस्त केली. त्यामुळे काम नसल्याने शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे पोटाची आग शमवण्यासाठी त्यांनी चक्क कचरा वेचण्याचे काम स्वीकारले आहे. दिवसभरात त्यांची ३०० रुपयांपर्यंत कमाई होते.

मेहनतीला घाबरत नाही, पण कचरा वेचणे हे कमीपणाचे काम समजले जात असल्याने, अनेकांना ओळख लपवून ते करावे लागत आहे. असे या शेतमजुरांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे या कचरा वेचक शेतमजुरांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे.

दुष्काळाचा फटका शेतकऱ्यांएवढाच शेतमजुरांची बसतो. त्यांच्या कुटुंबाचे संपूर्ण अर्थकारण हे मजुरीवर अवलंबून असते. त्यामुळेच सोलापूर, उस्मानाबाद, तुळजापूर, जालना आणि मराठवाड्यासह अन्य जिल्ह्यातील महिलांनी औरंगाबादची वाट धरून त्या शहरी भागात कचरा वेचकाच तर पती कंपनीत सुरक्षा रक्षकाचं काम करत आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातीलही एक कुटुंब असल्याचे आढळून आले आहे.टॅग्स

संबंधित बातम्या