कर्ज कसं फेडू...आत्महत्या करतोय; मित्रांना फोन करून शेतकऱ्याची आत्महत्या
11 April 10:25

कर्ज कसं फेडू...आत्महत्या करतोय; मित्रांना फोन करून शेतकऱ्याची आत्महत्या


कर्ज कसं फेडू...आत्महत्या करतोय; मित्रांना फोन करून शेतकऱ्याची आत्महत्या

कृषिकिंग, नाशिक: नाशिक जिल्ह्याच्या बागलाण (सटाणा) तालुक्यातील ताहाराबाद येथील बाळू धनाजी अहिरराव या ४२ वर्षीय शेतकऱ्याने काल (बुधवारी) दुपारी शेतातील कांदा चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी बाळू यांनी मित्रांना फोन करून थकीत कर्जामुळे आत्महत्या करत असल्याचे सांगितले.

बाळू अहिरराव यांची पाच एकर शेती आहे. शेतीसाठी त्यांनी एकता नागरी पतसंस्थेतून दोन लाख, एचडीएफसी बँकेतून १५ लाख तसेच खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. कर्ज थकल्याने खासगी सावकार व बँकांकडून तगादा सुरू होता. त्यातच कांद्याला कवडीमोल भाव मिळाला. त्यामुळे कर्जाची परतफेड करू न शकल्यामुळे काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते.

बुधवारी दुपारी ते शेतात गेले. त्यांनी मित्रांना फोन करून सांगितले की, "कांद्याला भाव नाही, पैशाची आशा नाही, कर्ज कसे फेडू, आता पर्याय नाही, मी फाशी घेत आहे, मला माफ करा, असे बोलून त्यांनी फोन कट केला." अशी माहिती त्यांच्या मित्रांनी दिली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या