पुण्यासह राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता- आयएमडी
11 April 09:47

पुण्यासह राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता- आयएमडी


पुण्यासह राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता- आयएमडी

कृषिकिंग, पुणे: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाबरोबरच पुणे शहरातही पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. दुपारी तुरळक ठिकाणी धुळीचे वादळ आणि मेघगर्जना होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात विदर्भामध्ये उष्णतेची तीव्र लाट असून, काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असून, तो देशात उच्चांकी ठरतो आहे.

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, ११ एप्रिलला तुरळक ठिकाणी धुळीचे वादळ आणि मेघगर्जनेची शक्यता आहे. १२ आणि १३ एप्रिलला आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारी तुरळक ठिकाणी धुळीचे वादळ, मेघगर्जनेचा अंदाज आहे. १४ एप्रिलला काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात हलका पाऊस, तर १५ आणि १६ एप्रिललाही शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडय़ात ११ आणि १२ एप्रिलला मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या