बॅटच्या आकारात केली गव्हाची कापणी; शेतकऱ्याकडून राजू शेट्टींचा अनोखा प्रचार
10 April 17:39

बॅटच्या आकारात केली गव्हाची कापणी; शेतकऱ्याकडून राजू शेट्टींचा अनोखा प्रचार


बॅटच्या आकारात केली गव्हाची कापणी; शेतकऱ्याकडून राजू शेट्टींचा अनोखा प्रचार

कृषिकिंग, कोल्हापूर: निवडणुकीच्या काळात कोण कसा प्रचार करेल, याचा काही नेम नाही. यावर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना निवडणुकीसाठी 'बॅट' हे चिन्हं मिळालं आहे. त्यांच्या या प्रचार चिन्हाचा अभिनव पद्धतीनं प्रचार सुरू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रुई या गावातल्या एका शेतकऱ्याने त्याच्या शेतातील गव्हाचं पिक अभिनव पद्धतीनं कापलं आहे. बॅटच्या आकारात त्यानं पिकाची कापणी केली असून, सध्या कोल्हापूर जिल्ह्यात या पिकाची कापणी चर्चेचा विषय ठरली आहे.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी "मला एक रुपया कमी द्या, पण बॅट चिन्हालाच मतदान करा;" म्हणत अनोख्या पद्धतीने राजू शेट्टी यांचा प्रचार करत असलेल्या शेतकऱ्याचा व्हिडीओ व्हायरल समोर आला होता. आणि आता या शेतकऱ्याने बॅटच्या आकारात गव्हाची कापणी करून शेट्टींच्या प्रचार चिन्हाचा अभिनव पद्धतीनं प्रचार सुरु केला आहे.संबंधित बातम्या