१० एप्रिल- कृषी महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांचा स्मृतिदिन
10 April 13:58

१० एप्रिल- कृषी महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांचा स्मृतिदिन


१० एप्रिल- कृषी महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांचा स्मृतिदिन

कृषिकिंग, पुणे: स्वत्रंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री, भारत कृषक समाज आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था (अमरावती) यांसारख्या ख्यातनाम संस्थांचे अध्यक्ष, शिक्षण महर्षी, कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाध्य भाऊसाहेब देशमुख यांचा आज स्मृतीदिन...त्यांना कोटी कोटी प्रणाम...

जन्म- २७ डिसेंबर १८९८. (अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी झाला)

उच्च शिक्षण घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात ते सहभागी झाले. इ.स. १९३६ च्या निवडणुकीच्या नंतर शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.

कृषी क्षेत्रातील कार्य- कृषी आणि शेती समृद्धीसाठी त्यांनी आपले अवघे जीवन समर्पित केले. त्यांनी भारत कृषक समाज यासंस्थेची स्थापना केली. १९५५ मध्ये ‘फूड फॉर मिलियन’ अर्थात ‘लाखोंसाठी अन्न’ हे अभियान त्यांनी सुरु केले. १९५८ मध्ये भातशेतीसाठी जपानी पद्धतीची सुरुवात केली. तसेच १९५९ मध्ये कृषी मेळाव्याचे आयोजन केले होते. ज्याचे उद्घाटन डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी केले होते. त्यांनी देशात कृषी महाविद्यालयांच्या स्थापनेची प्रक्रिया सुरु केली. आणि कृषी शिक्षण आणि संशोधनाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले.

शैक्षणिक कार्य- विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,००० च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी , तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय असे अनेक महाविद्यालये सुरू करून आज शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहे. अकोला येथील कृषी विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

मृत्यू- १० एप्रिल १९६५.टॅग्स

संबंधित बातम्या