बिहारमध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस; ६ जणांचा मृत्यू
10 April 12:17

बिहारमध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस; ६ जणांचा मृत्यू


बिहारमध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस; ६ जणांचा मृत्यू

कृषिकिंग, पटना: बिहारच्या काही भागामध्ये काल (मंगळवार) दुपारी अचानक वातावरण बदलले. आणि त्यानंतर बिहारच्या उत्तरेकडील भागासह अनेक प्रदेशांमध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. ज्यामुळे समस्तीपुर आणि दरभंगा जिल्ह्यातील ६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मुजफ्फरपुर जिल्ह्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बिहारच्या अनेक भागांमध्ये गहू, मका यांसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आकाशात ढग दाटून आल्यानंतर एकाएकी इतकी जोरदार गारपीट झाली, की शेतकरी डोळ्यासमोर आपलं पीक उद्ध्वस्त होत असताना काहीच करू शकले नाही. अनेक भागांमध्ये घरावरील छप्परे, पत्रे उडून गेली मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाकडून (आयएमडी) याआधीच १४ एप्रिलपर्यंत राज्यात ढगाळ हवामानासह जोरदार गारपीट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तो अगदी तंतोतंत खरा ठरला आहे.टॅग्स

संबंधित बातम्या