राज्यातील २८ हजार ५२३ गावांमध्ये भीषण दुष्काळ; केंद्राकडून उर्वरित निधी नाहीच
10 April 11:18

राज्यातील २८ हजार ५२३ गावांमध्ये भीषण दुष्काळ; केंद्राकडून उर्वरित निधी नाहीच

राज्यातील २८ हजार ५२३ गावांमध्ये भीषण दुष्काळ; केंद्राकडून उर्वरित निधी नाहीच

कृषिकिंग, पुणे: राज्यातील तब्बल २८ हजार ५२३ गावांमध्ये भीषण दुष्काळ असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या या २८ हजार गावांमधील सुमारे ८२ लाख २७ हजार १६६ शेतकरी दुष्काळामुळे प्रभावित झाले आहे. तर ८५ लाख ७६ हजार हेक्टर क्षेत्र दुष्काळाच्या छायेत आहे. मात्र, असे असले तरी राजकीय नेते, मंत्री मात्र निवडणूक प्रचारात मग्न आहेत.

केंद्र सरकारने राज्यातील दुष्काळासाठी ७ हजार २१४ कोटींचा मदतनिधी जाहीर केला होता. मात्र, त्यापैकी केवळ ४ हजार ७१४ कोटींचा निधी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. उर्वरित ३ हजार २४८ कोटी रुपये मिळणे अद्याप बाकी आहे. तर राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत ६७ लाख ३० हजार ८६५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४ लाख ४१ हजार २५७ लाख रुपये निधी जमा केला आहे.

टॅग्स

संबंधित बातम्या