चाऱ्याअभावी राज्यातील दुग्ध उत्पादन घटले
10 April 10:35

चाऱ्याअभावी राज्यातील दुग्ध उत्पादन घटले


चाऱ्याअभावी राज्यातील दुग्ध उत्पादन घटले

कृषिकिंग, पुणे: राज्यभरात भीषण दुष्काळाची परिस्थिती असून, अनेक जिल्ह्यांमध्ये चारा छावण्या सुरु करण्यात आल्या नसल्याचे चित्र आहे. राज्यात सध्यस्थितीत ८२ लाख जनावरांना चाऱ्याची नितांत गरज आहे. मात्र, राज्य शासनाकडून केवळ बीड, उस्मानाबाद आणि नगर तीन जिल्ह्यांमध्येच केवळ ८६९ चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहे. ज्याद्वारे साडे पाच लाख शेतकऱ्यांना चारा पुरवला जात आहे.

जनावरांना हिरवा चारा उपलब्ध होत नाही. तर दुसरीकडे सुका चाराही कमी प्रमाणात असून, सरकी पेंड, सुग्रास यांसारखे दरही शेतकऱ्यांना न परवडणारे आहे. त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात राज्याच्या दूध संकलनात २४ लाख लिटरने घट झाल्याची माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे.

तसेच यावर्षी दुष्काळामुळे राज्यातील दूध संकलनात ४० लाख लिटरने घट होण्याची शक्यता असून, परिणामस्वरूप दुधाच्या दरात वाढ होऊ शकते. असेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे.संबंधित बातम्या